महाराणा प्रतापसिंह यांची जयंती पालिकेच्या वतीने निगडी येथे साजरी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि.१३ जून २०२१
पराक्रमी योद्धा, कुशल प्रशासक आणि धुरंधर राज्यकर्ता महाराणा प्रतापसिंह यांनी भारताच्या इतिहासात वेगळा ठसा उमटविला असून त्यांची शौर्यगाथा कायम प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त त्यांच्या निगडी येथील पुतळ्यास उपमहापौर नानी घुले यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड,स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव,संतोष मोरे,नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप,जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते अशोक इंगळे, श्रीराम परदेशी, गणेश राजपूत आदी उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या.

Advertise

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम परदेशी यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *