मी पोलीस चौकशीला जाणार नाही, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे – किशोरी पेडणेकर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२


किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीदेखील त्यांच्यावर या घोटाळ्याप्रकरणी आरोप केले आहेत.या आरोपानंतर आता पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप साफ फेटाळून लावले. शिवाय दादर पोलीस स्थानकात चौकशीला मी जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे दबावतंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कसंही करुन मला अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हंटलं आहे. दरवेळी किरीट सोमय्या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. या प्रकरणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणाशी संबंध असलेल्या विभागानेही यामध्ये माझा संबंध नसल्याचे लिहून दिलेले आहे. एका सामान्य महिलेला त्रास दिला जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी सोमय्यांवर केला. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *