निरंकारी मिशनच्या अनुयायांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्षारोपण…

आळेफाटा (पुणे), दि.६ जून : निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संत निरंकारी सत्संग भवन, आळेफाटा या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी २.५ फुटी उपयुक्त २२ वृक्ष लावण्यात आले व त्यांच्या संगोपनाची शपथ घेण्यात आली. यावेळी मिशनचे आळेफाटा सेक्टर प्रमुख चंद्रकांत कुऱ्हाडे, सेवादल संचालक संतोष कुऱ्हाडे , शहाजी नाळे सह मंगेश बडद आदी सत्संगचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.

“विधात्याने निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीची काळजी घेणे आमचे परम कर्तव्य आहे”. ही अनमोल वचने संत निरंकारी मिशनची आध्यात्मिक प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचा संदेश आहे जो पर्यावरणाच्या प्रती मानवी दृष्टीकोनामध्ये सतत परिवर्तन घडवून आणण्यासाठी सहाय्यक सिद्ध होत आहे.

या वर्षी विश्व पर्यावरण दिवसानिमित्त कोणताही उपक्रम राबविण्यासाठी देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मर्यादा पडत असल्याने नियमितपणे अखिल भारतीय अभियान राबविणे शक्य होत नाही; परंतु पर्यावरण समतोलाची पुन:स्थापना करण्याचा संदेश जो २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा विषय आहे तो वर्चुअल रूपात सर्व निरंकारी भक्तगणांना अवगत करण्यात आलेला असून आपापल्या स्थानिक परिस्थितीबाबत जागरुक राहण्यासाठी प्रेरित केले आहे. सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी पर्यावरणाचा समतोल ठेवण्याच्या बाबतीत जागरुक होण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *