घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
राज्यातील अनूसूचित जमातीच्या मुला -मुलींना परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.त्याकरिता संबंधित विदयार्थ्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये अशी अट लादण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र २०२१ -२०२२ या वर्षात योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आदिवासी विदयार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्ती योजनेतुन १० मुला -मुलींना लाभ मिळणार आहे. घोडेगाव एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अशी माहीती घोडेगाव एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी श्रीमती जागृती कुमरे मॅडम यांनी दिली
या अभ्यासक्रमासाठी मिळेल शिष्यवृत्ती : –
एम.बी ए ( पदव्युत्तर ) दोन जागा , वैद्यकीय अभ्यासक्रम (पदवी पदव्युत्तर ) दोन जागा, बी.टेक. इंजिनिअरिंग (पदवी पदव्युत्तर ) दोन जागा , विज्ञान (पदवी पदव्युत्तर ) एक जागा, कृषी (पदवी पदव्युत्तर ) एक जागा , इतर विषयाचे अभ्यासक्रम (पदवी पदव्युत्तर ) एक जागा