घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव ता.आंबेगाव येथे सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी शनेश्वर जन्मोस्तोव साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने विधीवध पूजा अर्चा करण्यात आली. मानाचा अभिषेक पहाटे 5 वाजता शनेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री .अजित चिलेकर यांच्या हस्ते करण्यात आला जयंती निमित्त मंदिरात आकर्षक अशी फुल सजावट करण्यात आली.
सायंकाळी ठीक 6 वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्तीतीत करण्यात आला.
त्या वेळेस शनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष
श्री रवींद्र कर्पे, विश्वस्त श्री अजित चिलेकर ,वासुदेव कर्पे अनिल काका कर्डीले, दीपक घोडेकर ,स्वप्नील कोरडे, राहुल झुंणझुरके ,विनायक कर्पे ओंम कर्पे, पुजारी संतोष रुकारी उपस्थित होते.