मद्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू,नातेवाईकांनी केला अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल..!!

बातमी – प्रतिनिधी, दीपक मंडलीक, माळशेज.

डिंगोरे- दि.2 जून रोजी डिंगोरे गावाच्या हद्दीतील,नगर कल्याण महामार्गावरील हॉटेल शिवशाही या नावाने चालू असलेल्या हॉटेल च्या बाहेर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुणीतरी बेशुद्ध अवस्थेत पडलेला इसम येथील वेटर ला दिसला त्याने लागलीच हॉटेल मालक बाळू बबन नायकोडी याला सांगीतले असता नायकोडी हे त्या इसमास ओळखत असल्याने त्यांनी त्या इसमाच्या नातेवाईकांना फोनवरून कळविले,काही वेळातच तो इसम सुधीर सहादू उजिरडे -राहणार डिंगोरे अशी ओळख पटल्याने त्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले परुंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित करून पुढील कारवाही साठी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री परशुराम कांबळे यांना आपल्या सहकाऱयांसह बोलावून नातेवाईकांसह डेडबोडी शवविच्छेदनासाठी पाठवून दिली,


शवविच्छेदनांदरम्यान मयताच्या पोटात मोठ्या प्रमाणात कुठलीतरी दारू मिळून आली व जास्त प्रमाणात दारू प्यायलाने मृत्यू झाल्याचे प्राथमिक पाहणीत डॉक्टरांनी सांगितले,
हॉटेल शिवशाही चे मालक बाळू बबन नायकोडी हे अनेक वर्षांपासून डिंगोरे गावाच्या हद्दीत हॉटेल व्यवसाया बरोबरच अवैध देशी,विदेशी व गावठी दारू विकत आहे हे अनेक वेळा ग्रामस्थानीं व पदाधिकाऱयांनी पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते त्यानुसार अनेक वेळा नायकोडी यांच्यावर वेळोवेळी कठोर कारवाही सुद्धा करण्यात आली होती परंतु या सर्व गोष्टींना न जुमानता  सुमारे 25 वर्षांपासून या गावात दारूबंदीचे शासकीय आदेश असताना आपला अवैध व्यवसाय नक्की कोणाच्या आशीर्वादाने चालू ठेवला होता या बाबत मात्र अजूनही शंका व्यक्त केली जात आहे

या सर्व प्रकारा नंतर मयताचे भाऊ सुहास सहादू उकिरडे यांनी पोलीस स्टेशन ला धाव घेऊन बाळू नायककोडी याच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर खातरजमा करून आरोपी बाळू बबन नायकोडी याला ताब्यात घेऊन ओतूर पोलिसांनी भा द वी कलम 304 नुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून नायकोडी यास अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले,या बाबतचा सविस्तर तपास ओतूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री परशुराम कांबळे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *