३१ वर्षांच्या प्रदिर्घ सेवबद्दल दशरथ जाधव यांचा पंडीत नेहरू विद्यालय कामशेत यांच्या वतीने करण्यात आला सपत्नीक सत्कार…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि. ५ जून २०२१ (ओझर ) : नुकताच पंडित नेहरू विद्यालय कामशेतच्या प्रांगणात , आदर्श नाईक दशरथ जाधव यांचा ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे या आदर्श शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून श्री.दशरथ जाधव यांना काम करण्याची संधी मिळाली.पंडित नेहरू विद्यालय कामशेत येथून ते नाईक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
प्राचार्य श्री.बाळू शेंडे.,पर्यवेक्षिका सौ.धनश्री साबळे.व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर यांच्या वतीने जाधव यांचा सपत्नीक संपूर्ण पोशाख,सन्मान चिन्ह,मानपत्र,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी विद्यालयातील श्री.सिद्धार्थ गायकवाड , भीमा केंगले,भरत दहितुले.सौ.अर्चना दरंदले,भीमराव भोसले ,भिमाजी हिंगे यांनी यांच्या कार्याचा गौरव केला. सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमामध्ये दशरथ जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून सेवेच्या काळातील वेगवेगळ्या आठवणी व अनुभव सांगितले.यावेळी आपले अश्रु त्यांना आवरता आले नाही. जाधव यांची मुले
चि.स्वप्नील व चि.सचिन यांनी आपल्या वडिलांच्या घरच्या आठवणी सांगितल्या. यावेळी आपल्या मनातील भावना त्यांनाही आवरता आल्या नाहीत.दशरथ जाधव यांनी छत्रपती हायस्कूल येणेरे ता.जुन्नर , श्री विघ्नहर विद्यालय ओझर ता.जुन्नर व अखेर पंडीत नेहरू विद्यालय कामशेत ता.मावळ ह्या ठिकाणी आपल्या सेवेचा कार्यकाल पूर्ण केला.


डि.के.गायकवाड सर यांनी मानपत्राचे वाचन केले तर शरद वाजे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व दत्तात्रय पोवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी दशरथ जाधव यांचे जवळचे नातेवाईक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती ,तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दशरथ जाधव यांना शुभसंदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. अखेर सुंदर अशा वातावरणात या सेवापूर्ती गौरव समारंभाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *