स्वप्न राष्ट्रवादीचे श्रेय लाटतायेत भाजपाई – संजोग वाघेरे पाटील

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२३ नोव्हेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड


पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर,चिंचवड येथील शाहू सृष्टी  हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात मान्यता मिळालेल्या शहरातील महत्वकांशी प्रकल्पापैकी हे एक प्रकल्प आहे. सन २०१६ रोजी शाहू सृष्टीच्या कामाचे भूमिपूजन मा. अजितदादा पवार साहेब, पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. सुमारे  १ कोटी ८० लाखाचे काम सुरु असून दुस-या टप्प्यातील कामांसाठी सुमारे ७ कोटी ४६ लाख मंजूर  करण्यात आले आहेत. शाहूसृष्टी व फुले सृष्टीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम मा.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजप पक्षामार्फत करण्यात येत आहे. सदर भूमिपूजनांच्या निमत्रंण पत्रिकेत मा. अजितदादा पवार साहेब यांचे नाव टाकण्यात आले आहे परंतु आज पर्यंत पालकमंत्र्यांना रितसर निमत्रंण दिले गेले नाही अथवा निमत्रंण पत्रिका पाठविण्यात आलेली नाही. किंवा बोलणे झाले नाही. तसेच एकाद्या प्रकल्पाचे रितसर भूमिपूजन झाले असता केवळ श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजप परत मा.संभाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे नियोजन करीत आहे.

मागील चार वर्षात नाव घेण्यासारखे एकतरी काम भाजपने केले आहे काय? राष्ट्रवादी कॉग्रेसने मंजूर केलेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांचे उद्घघाटने करुन फक्त त्या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचे काम  भाजप करत आहे. आता महापालिकेच्या निवडणूका आल्या म्हणून आम्ही शहरातील नागरीकांसाठी काम करतोय हे दाखवून देण्याचा खटोटोप चालू आहे. परंतु शहरातील जनता आता सर्व जाणून आहे. मागील चार साडेचार वर्षात काय दिवे लावले ते ओळखून आहे.असा घणाघात आज राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगला कदम, आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

शाहू सृष्टी हा प्रकल्प राष्ट्रवादी कॉग्रेसने सत्ता असताना मंजूर करुन त्याचे कामही चालू केले होते, याउलट मागील चार वर्षात या प्रकल्पाची काहीच प्रगती झाली नाही आता निवडणूकांच्या तोडांवर या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा घाट घातला जात आहे. या भूमिपूजनासाठी  पालकमंत्र्याना निमंत्रण न देता निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले आहे, हे सर्वथा चुकीचे आहे. याचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामार्फत आम्ही जाहीर निषेध करतो तसेच सदर प्रकल्पाचे भूमिपूजन २०१६ रोजी मा. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते झाल्याने या भूमिपूजनास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या तीव्र विरोध राहिल. शाहू,फुले आंबेडकर  हि महाराष्ट्राची दैवते आहेत याबाबत तरी भाजपने राजकारण करु नये.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *