रोहित खर्गे
विभागीय संपादक
मागील काही दिवसांपासून करोना महामारीच्या लॉकडाऊन काळात नागरिकांना प्रत्यक्षात भेटता आले नाही. म्हणून ऑनलाइन संवाद या उपक्रमाअंतर्गत परिसरातील सोसायटी व नागरिकांसोबत सहकार्यासामावेत ऑनलाइन मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रत्यक्षात संवाद साधून रहाटणी- पिंपळे सौदागर प्रभागातील नागरिकांच्या विशेषतः सोसायटी मधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी ऑनलाइन सभेचे आयोजन केले होते.या सभेमध्ये सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार व कमिटी सदस्य सभासदांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सोसायटीच्या अडचणी मांडल्या तसेच नाना साहेबांनी आणि त्यांच्या टीमने कोरोना काळात केलेल्या सहकार्याचे व कामाचे कौतुक केले.त्याचबरोबर काही चांगले सल्ले पण दिले.काही नागरिकांनी प्रभागातील होत असलेल्या विकास कामाबाबत प्रश्न विचारले त्यांना श्री. नाना काटे यांनी माहिती दिली.तसेच लॉकडाऊन काळात सर्व आय. टी. नोकरदार नागरिक घरून काम करत आहेत. त्यांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. एम. एस. ई. बी.विभागाकडून कसलाही मेसेज किंवा कल्पना नसल्यामुळे वीज परत कधी येईल याची माहिती नसते त्यामुळे संभ्रम निर्माण होतो.त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.यावर एम एस ई बी च्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन श्री. विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी दिले. तसेच ऑनलाइन सभेला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन व्यक्त झाल्याबद्दल व करोना काळात सोसायटी सभासदांनी केलेल्या कामाचे देखील कौतुक व आभार नाना काटे यांचा वतीने करण्यात आले .