शासनाच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या निमित्त, दि. २१/०९/२०२२ रोजी एकदिवसीय भव्य महासेवा शिबीर, तक्रार निवारणासाठी विविध विभाग एकाच छताखाली

रविंद्र खुडे
विभागीय संपादक 
२० सप्टेंबर २०२२

शिरुर


महाराष्ट्र शासनाच्या वतीने “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर असा राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या सर्व विभागातील प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने संपुर्ण पुणे जिल्हयात एकाच वेळी म्हणजे दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी महासेवा दिन आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार शिरुर येथेही भव्य महासेवा दिन आयोजित करण्यात आला असुन त्याचा नागरीक, विदयार्थी व लाभार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे नियंत्रण व समन्वय अधिकारी तथा शिरुर चे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे महसुल, नगरविकास, ग्रामविकास, महावितरण, पोलिस, आरोग्य, कृषी पशुसंवर्धन, शिक्षण, आपले सरकार पोर्टल व राज्य शासनाच्या इतर सर्व विभागाच्या योजनांचा, सेवांचा व प्रलंबित अर्जाचा लाभ नागरीक, विदयार्थी व लाभार्थी यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी, शिरुर येथील जुनी नगरपरिषद इमारत मंगल कार्यालय सभागृह, येथे आयोजित करणेत आलेल्या महासेवा दिन शिबीरामध्ये घ्यावा असे आवाहन, शिरुरचे प्र. तहसिलदार प्रशांत पिसाळ व नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *