रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी धरमचंद फुलफगर यांची निवड…

बातमी – विभागीय संपादक, रवींद्र खुडे
शिरूर : दि. 28/05/2021

       शिरूर शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते धरमचंद भवरीलाल फुलफगर, यांची रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना, न्हावरे, ता. शिरूर, जी. पुणे, च्या तज्ञ संचालक पदी आज निवड करण्यात आली.

      या  निवडीचे पत्र नुकतेच रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, ॲड. रंगनाथ थोरात यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक सतीश धाडीवाल, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व सी टी बोरा कॉलेज चे निवृत्त प्राचार्य नंदकुमार निकम, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे प्रदेश चिटणीस ॲड. शिरीष लोळगे, तालुका अध्यक्ष ॲड. प्रदीप बारवकर, शहर अध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी लीगल सेल उपाध्यक्ष संजय ढमढेरे, सुनील धाडीवाल, देवल शहा, सुनील बोरा, देवेंद्र फुलफगर, प्रकाश बोरा आणि राजू भटेवरा उपस्थित होते.

      २० मे २०२१ रोजी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची बैठक झाली.  या बैठकीत शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते व सराफ व्यावसायिक धरमचंद भवरीलाल फुलफगर, यांची तज्ञ संचालक पदी एकमताने ठरावात निवड झाली.

      धरमचंद फुलफगर हे शिरूर शहरातील एक प्रसिद्ध सराफ व्यवसायिक असून, शिरूर, आंबेगाव व पारनेर तालुक्यात पाणीटंचाईच्या काळात, नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून पाण्याचे टँकर असो, गोरगरीब अनाथ विद्यार्थ्यांना मदत असो, समाजातील गोरगरीब नागरिकांना मदतीला नेहमी ते अग्रेसर असतात. कोरोना काळात सुरू असलेल्या कोरोना रूग्णांच्या शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील विविध कोव्हिड केअर सेंटर, येथेही त्यांनी भरीव मदत केली आहे.

       त्यांच्या निवडीबद्दल शिरूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, प्रसिद्ध उद्योगपती व शीरुर न. पा. चे सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *