तुमच्या खाजगी माहितीचा गैरवापर होऊ शकतो – डॉ.केळकर

०५ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी, जसजसे तांत्रिक व्यत्यय अधिकाधिक सामान्य आणि मोफत मिळत आहे, तसतसे आपल्या जगण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे आपले जीवन अनेक प्रकारे विस्कळीत होत आहे. सरासरी दिवसभरात ६ तास व्हॉटस ॲप तर ३-४ तास फेसबुक वापरत आहे. विद्यार्थ्यांनी शंभर टक्के तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नये.यामुळे दैनंदिन जीवनात आपण आपला वेळ सोशल मीडियावर वाया घालावत आहात हि धोक्याची घंटा आहे.स्मार्टफोन सारख्या स्मार्ट गॅजेटद्वारे तुमच्यावर देखरेख ठेवली जात आहे. तुमच्या खाजगी माहितीचा भविष्यात गैरवापर होवू शकतो. असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर यांनी दिला.

निगडी येथील आयआयसीएमआरच्या वतीने  दिशारंभ-22′ या विद्यार्थी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.यावेळी ते बोलत होते. यावेळी गोक्केन इंडिया प्रा. लि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील गावडे,वेबक्लिंचर कंपनीचे संस्थापक देवदत्त मंदोरे, मार्सियन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक  मनोरंजन दाश,  आयआयसीएमआर चे  संचालक डॉ. अभय कुलकर्णी,  व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. मनीषा कुलकर्णी,डॉ. सुधीर हसमनीस यांच्यासह संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी डॉ. विनोद भेलोसे आणि डॉ. जयश्री मुरली आयानगर यांना 2021-22 वर्षासाठी संस्थेमध्ये प्रगतीमध्ये विशेष योगदानाबद्दल 2020-21 चा “केशव पुष्प पुरस्कार” देऊन सन्मानित केले.  वेबक्लिंचर अकादमी आणि आय आय सीएमआर एमबीए आणि मार्सियन टेक्नॉलॉजीज यांच्यात सामंजस्य करार झाला.

गोक्केन इंडिया प्रा. लि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील गावडे  म्हणाले कि , गेल्या काही वर्षांत व्यापार जगतात अनेक बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे व्यवसाय विस्कळीत होत आहेत आणि त्यांना या बदलांशी जुळवून घ्यावे लागेल आणि ते मागे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. तांत्रिक व्यत्यय हा केवळ व्यवसायापुरता मर्यादित नाही तर त्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावरही होत आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) ने तंत्रज्ञान अधिक सुलभ आणि आमच्या बोटांच्या टोकावर उपलब्ध केले आहे. रोबोटिक्स, जीनोमिक्स आणि 3D प्रिंटिंग या सर्वांचा भविष्यात आम्ही कसे कार्य करतो. यावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) आमच्या व्यवसायाच्या पद्धतीमध्ये व्यत्यय आणत आहे. व्यवसाय आता बदलाशी जुळवून घेत आहेत. तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधामुळे ते बाधित झाले आहेत आणि त्याचे फायदे त्यांना आता दिसू लागले आहेत. व्यवसाय आता त्यांच्या व्यवसाय प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि त्यांना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी IOT, Ai, रोबोटिक्स, जीनोमिक्स, 3d प्रिंटिंग, साहित्य आणि TPM मॅट्रिक्स सारख्या तांत्रिक नवकल्पनांचा वापर करत आहेत.

डॉ अभय म्हणाले कि, कोविड-19 नंतर मनुष्य व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यवसायाच्या गरजेनुसार यशस्वी होण्यासाठी महत्वाचे 10 कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना व्यवसायातील बदलांना सामोरे जावे लागेल. प्रेरणा आणि नवोपक्रमाद्वारे त्यांच्या भविष्यातील स्वप्नातील संक्रमण साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा शोध घेण्यापासून बदल करणे आवश्यक आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ दीप्ती शर्मा, डॉ राजेंद्र आगवणे,डॉ मधुरा देशपांडे,दिलीप पवार,हर्षल पाटील,दीप्ती बाजपेयी,स्वप्नीशा खांबायत पुजा नलावडे,पुजा गावंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन अमय, आयुषी, सबा, शोएब, देबलीना, पलक, प्रिया, सुमित, श्रीकृष्ण, अर्घो, रोहन आणि आंचल यांनी केले. आभार  दीप्ती बाजपेयी व  हर्षल पाटील यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *