वायसीएममध्ये एक्स-रे मशीन बंद पडल्याने रुग्णांची गैरसोय

१४ डिसेंबर २०२२

पिंपरी


महापालिकेच्या पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती स्णालयामधील ( वायसीएम ) २ एक्सरे मशिन गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वेळप्रसंगी , रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. नातेवाईकांची धावपळ वायसीएम रुग्णालयात दररोज सुमारे हजार रुग्ण तपासणीसाठी येतात . त्यापैकी , रुग्णालयात उपचारासाठी प्रत्यक्ष दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे . विविध आजारांची तपासणी करण्यासाठी एक्स – रे व गर्भवतींसाठी सोनोग्राफी मशीन अत्यावश्यक आहे . एक्स – रे मशीन तपासणीसाठी ९ ० रुपये शासकीय दर आहेत . त्यामुळे सामान्य जनतेला ते परवडण्यासारखे आहे.

रुग्णालयामध्ये एकूण ७ एक्स – रे मशीन आहेत . त्यापैकी ५ पोर्टेबल मशीन आहे . तर दोन मशीन विभागांमध्ये बसविलेल्या आहेत . पोर्टेबल मशीनपैकी दोन मशीन सध्या नादुरुस्त आहेत . रुग्णालयात एक्सरे काढल्यानंतर रिपोर्ट मिळण्यासदेखील विलंब होत आहे . त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ उडत आहे . मशीन तातडीने सुरू व्हाव्यात ट्रामा , फॅक्चर , आतड्यांचे आणि फुफ्फुसाचे विकार आदींसाठी एक्स – रे मशीनची गरज भासत आहे . रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बंद पडलेल्या दोन एक्स – रे मशीन लवकर सुरू व्हायला हव्या , अशी रुग्णांची मागणी आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *