पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीच्या बैठकीत सभापती नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांना मंजुरी

रोहित खर्गे
विभागीय संपादक, पुणे

पिंपरी, दि. १२ मे २०२१ :- महानगरपालिकेच्या विविध रुग्णालये, जंबो कोविड सेंटर तसेच कोविड हॉस्पीटलकरीता आवश्यक असणारे रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या १० हजार व्हायल्स खरेदीसाठी येणा-या ३ कोटी २ लाख खर्चासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण सुमारे ४९ कोटी ३२ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

स्थापत्य विभागाकडील शिंदे वस्ती रावेत येथील रस्त्याचे बीसी पध्दतीने डांबरीकरण करणे आणि इतर अनुषंगिक कामे करण्याकामी होणा-या १ कोटी १५ लाख ६५ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र.४ मधील दिघी येथे डांबरी रस्ते किरकोळ देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणा-या २७ लाख ९६ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.७ मध्ये अंतर्गत कॉलनी रस्ते आणि मुख्य डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करण्याकामी येणा-या ३१ लाख ७३ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.४ दिघी मधील विविध ठिकाणी हॉटमिक्स पध्दतीने डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्याकामी येणा-या ३३ लाख ८८ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

स्थापत्य विभागाकडील आरक्षण क्र.२२१ येथे बहुउद्देशिय क्रिडांगण विकसित करण्याकामी येणा-या ५२ लाख ९९ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

जलनि:सारण विभागाकडील च-होली मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील मोशी गावठाण आणि शिवाजीवाडी, लक्ष्मीनगर, आदर्शनगर, गंधर्वनगरी, डुडुळगाव, शास्ञीचौक परिसरात मलनि:सारण विषयक कामे करण्यासाठी येणा-या ३० लाख ८० हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

विद्युत विभागाकडील प्र.क्र.८ से.क्र.४ मोकळी जागा क्र.४ येथे विरंगुळा केंद्र व उद्यान उभारणेकामी येणा-या २७ लाख ४७ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

विद्युत विभागाकडील प्रभाग क्र. ३ मोशी येथील मोरया कॉलनी फातिमानगर, खानदेशनगर, संत ज्ञानेश्वर नगर इ. ठिकाणचे रस्ते अद्यावत पद्धतीने विकसीत करणे या कामातील विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या २ कोटी २५ लाख २३ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

आरोग्य विभागाचे मागणीनुसार आवश्यक पायरेथ्रम एक्स २ टक्के आय एस आय मार्क खरेदी करण्याकामी येणा-या ४९ लाख ४५ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ६ मध्ये भगतवस्ती, गुळवेवस्ती व परिसरात कॉंक्रीट पेविंग व पेव्हींग ब्लॉकची कामे करणेकामी येणा-या ३४ लाख २ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ६ मध्ये धावडेवस्ती परिसरात कॉंक्रीट पेविंग आणि पेव्हींग ब्लॉकची कामे करण्याकामी येणा-या ३३ लाख ६५ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.९ मासुळकर कॉलनी मधील परिसरात पेव्हींग ब्लॉक दुरुस्ती तसेच नवीन पेव्हींग ब्लॉक बसविणे आणि इतर अनुषंगिक कामे करण्याकामी येणा-या २५ लाख ९३ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मधील चक्रपाणी वसाहत व परिसरात अंतर्गत रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करणेकामी येणा-या २८ लाख ६६ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.३० दापोडी मधील मुख्य रस्ते व इतर ठिकाणचे रस्ते डांबरीकरण करणेकामी येणा-या १ कोटी ७४ लाख २७ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

ह क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत सांगवी येथील पीडब्लूडी मैदान येथे तातडीने उभारावयाच्या ४०० बेडच्या कोविड-१९ रुग्णालयाकरिता म.रा.वि.वि.कंपनी कडून उच्चदाब विजपुरवठा जोडून घेणेकामी सुरक्षा ठेवीसाठी येणा-या १ कोटी ३१ लाख १ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

स्थापत्य विभागाकडील चिंचवड गावठाण, गोखले हॉल, गांधी पेठ, पडवळ आळी, भोईर आळी आणि इतर परिसरातील फुटपाथची दुरूस्तीची कामे करण्याकामी येणा-या २९ लाख २५ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१८ मधील शिवाजी उद्यान मंडळाचे मैदानामध्ये प्रेक्षक गॅलरी उभारण्याकामी येणा-या २८ लाख १३ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१७ मधील दळवीनगर बिजलीनगर भागातील रस्त्याचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्याकामी येणा-या ३३ लाख ५१ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१७ मधील वाल्हेकरवाडी येथे विविध ठिकाणी डांबरीकरण कऱणेकामी येणा-या २५ लाख ५३ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१६ लगत मामुर्डी स्मशानभुमीचे कामे करण्यासाठी येणा-या २६ लाख ५० हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे जिजाऊ पर्यटन केंद्र भाग १ व २ पार्वती उद्यान चिंचवड देखभाल करण्याकामी येणा-या ५१ लाख ३ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २७ रहाटणी मधील विविध भागात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करण्यासाठी येणा-या ३४ लाख २२ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २३ थेरगाव मधील पवारनगर परिसर, पडवळनगर परिसर, कुणाल रेसिडेन्सी परिसर व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्था सुधारणा कामे करण्याकामी येणा-या ३९ लाख ३२ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २७ रहाटणी मधील नव्याने विकसीत करण्यात येणा-या रस्त्यामध्ये जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करण्याकामी येणा-या ३४ लाख ७२ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

से.क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रामधील टप्पा क्र.१ च्या प्युअर वॉटर पंपसाठी सुरक्षा आवरण करणे आणि तदनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या ४९ लाख ३ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २३ मधील नविन थेरगाव हॉस्पीटलमधील अत्यावश्यक फर्निचर करणेकामी येणा-या ३० लाख १० हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना-१९ या संसर्गजन्य रुग्णांची संख्या जास्त असलेने व त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असलेने थेरगाव, आकुर्डी, व जिजामाता रुग्णालयामध्ये आयसीयु बेड्स व इतर बेड्स सुरु करणेसाठी आवश्यक ०५ प्रकारचे उपकरणे/साहित्य तातडीने खरेदीकामी येणा-या ३९ लाख ९० हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १२ तळवडे गाव येथील मनपा शाळेची स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्ती करुन रंग सफेदी करण्याकामी येणा-या २६ लाख ९५ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १ मधील अंगणवाडी रोड ते साने चौक परिसरातील अंतर्गत भागात पेव्हींग ब्लाँक बसविणे आणि दुरूस्ती करण्याकामी येणा-या ३१ लाख ९४ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१ मधील सिंहगड काँलनी ते अंगणवाडी रोड परिसरात अंतर्गत भागात पेव्हींग ब्लाँक बसविणे व दुरूस्ती करण्याकामी येणा-या ३१ लाख ८२ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मधील मनपा इमारतींची स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणा-या ४० लाख ७८ हजार खर्चास मान्यता देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *