आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथील ८२ वर्षीय आजीं बाईचें आज घोडेगाव येथे निधन झाले. तसेच त्यांचा मुलगा कोरोना बाधित झाल्याने अँडमिट असल्याने व जवळ नातेवाईक नसल्याने , त्यांचे करोनामुळे निधन झाल्याने या रुग्णाचा अंत्यसंस्कार कसा होईल असा प्रश्न निर्माण झाला होते त्यामुळे स्वतः घोडेगावचे लोकनियुक्त सरपंच क्रांती गाढवे ,उपसरपंच सोमनाथ काळे, यांनी पुढाकार घेवून सोबत ग्रामपंचायत सदस्य वर्षा काळे यांचे पती संतोष काळे , सामाजिक कार्यकर्त स्वप्नील कोरडे यांनी स्वईच्छेने मदतीला धावून पीपीई किट परिधान करून या महिलेचे अंत्यसंस्कार केले.
करोनामुळे सख्खे नातेवाईक लांब जातात. आजीबाईचा मुलगा स्वता कोरोनामुळे उपचार घेत असल्याने , गावचे सरपंच या नात्याने क्रांती गाढवे ,उपसरपंच सोमनाथ काळे यांनी पुढाकार घेत पाणी देण्यासाठी स्वतः घागर उचलली आणि त्या मृत आत्म्यास पाणी दिले.
आपण सरपंच झालो म्हणजे फक्त राजकारणच करायचं, असे न करता समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणे लागतो या आविर्भावाने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी राम ग्रामीण पतसंस्थेच्या रुग्ण वाहिकेची मदत झाली तसेच उपसरपंच सोमनाथ काळे यांनी स्वताची कार कोरोना सेवेसाठी लावली आहे.या प्रसंगी रुग्णवाहीका चालक गणेश काळे , आतुल ठोसर , ग्रामपंचायत कर्मचारी विनायक कर्पे, वसंत झोडगे, तानाजी काळे यांनी अंत्यविधी करण्यास हातभार लावला.