पिंपळे गुरव परिसरात चार गाड्या जळून खाक…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ११ मे २०२१
पिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे गुरव परिसरात चार मोटारी जळून खाक झाल्या आहेत.

जमिनी खाली असलेल्या गॅस पाईप लाईन चे काम सुरू असताना ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली असून आगीवर नियंत्रण मिळविलेलं आहे. कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *