75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२


महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार नोकऱ्या देण्याचा निश्चय सरकारचा आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. 2 हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील. पण हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टात जाऊन जागा अडवू नका किंवा स्थगिती आणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. या महासंकल्प रोजगार मेळाव्याची सुरुवात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. आज दोन हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील तरुणांच्या रोजगाराच्या पूर्ततेची सुरुवात राज्य सरकारने केली आहे. केंद्र सरकार आपल्या केंद्रीय विभागात 10 लाख नोकऱ्या देणार आहे. राज्यानेही आपल्या राज्यात तरुण तरुणींना रोजगार द्याव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्यानंतर पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहेदेशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार 75 हजार जागा भरणार आहे. शासकीय नोकरीत अघोषित बंदी आहे ती संपवावी असा निर्धार सरकारने केला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *