पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करा:-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले पत्र…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी दि.11/05/2021

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करा:-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले पत्र…

विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

महाराष्ट्रातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून घोषित करण्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृह विभागाच्या वतीने मागणी केली आहे.
तसे पत्र त्यांनी आज (दि.11) मुख्यमंत्र्यांना दिले असून पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सद्य स्थितीतील कोविड-19 या साथरोगाच्या अनुषंगाने अनेक जेष्ठ पत्रकारांकडून पत्रकारांना ‘ फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून घोषित करण्याबाबत निवेदन प्राप्त होत आहेत. भारतातील इतर काही राज्यात पत्रकारांना त्या त्या राज्याने ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून घोषित केले असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा विविध स्तरातून अनेक पत्रकारांकडून ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून घोषित करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा.
याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य निर्देश देण्याची त्यांनी विनंती गृहमंत्री वळसे पाटील यांनी केली आहे.