नारायणगाव येथे पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामामुळे अनेक अडचणी.

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
७ ऑक्टोबर २०२१

नारायणगाव

शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने आर्थिक नुकसान.

नारायणगाव येथे सुमारे २२ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र गावातील अनेक लहान मोठ्या रस्त्यांच्या कडेला पाईपलाईन साठी खांडलेल्या खड्ड्यामध्ये पाईप टाकल्यानंतर पुन्हा खड्डे सुस्थितीत केले नसल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य झाले आहे. तसेच काही ठिकाणी चार चाकी वाहने अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावरील धर्मराज प्लाझा या व्यावसायीक इमारतीसमोर एक चार चाकी पिकअप गाडी येथील पाइपलाइनच्या निकृष्ट कामामुळे आज दिनांक ०७ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास खड्यात फसला. यावेळी या गाडीमध्ये असलेल्या कांदा गोणी भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

पाणीपुरवठ्यासाठी खांडलेल्या खड्ड्यात चारचाकी अडकली.

या कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच येथून प्रवास करणार्‍या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाईपलाईन साठी खड्डा खांडल्यानंतर पुन्हा तेथील रस्ता सुस्थितीत करणे गरजेचे असताना संबंधित काम करणारे ठेकेदार केवळ माती टाकून या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते व वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष जुबेर शेख तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष गौतम औटी यांनी या ठेकेदारांचा निषेध व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट नारायणगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *