खोपोलीचा बडा उद्योजक विनोद जगदीशप्रसाद जाकोटीया याला बेड्या

नारायणगाव (किरण वाजगे कार्यकारी संपादक)
मागील आठवड्यात नारायणगाव (ता.जुन्नर) येथे रेमडेसिवीर या इंजेक्शनचा बेकायदा विक्री व्यवहार करताना रोहन शेखर गणेशकर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रंगेहात पकडले होते. याप्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता खोपोली येथील बडा उद्योजक जगदीशप्रसाद जाकोटीया याच्यासह अन्य दोघांना नारायणगाव पोलिसांनी गुरुवारी बेड्या घातल्या अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

अटक आरोपी रोहन शेखर गणेशकर याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने रेमडेसिवीर इंजक्शन हे खोपोली जि रायगड येथुन आरोपी १) स्वप्निल सुनिल देशमुुख (गुरव) वय १९ वर्ष रा विठठल मंदीरासमोर वरची खोपोली ता खालापुर जि रायगड, २) आकाश प्रकाश कलवार वय २५ वर्ष रा लोहाना हाॅल समोर, कल्पतरू अपार्टमेंट दुसरा मजला, वरची खोपोली ता खालापुर जि रायगड, ३) विनोद जगदीशप्रसाद जाकोटीया वय ४० वर्षे रा रूम नं ३ विनोद बिल्डींग, विनोद सिरॅमीक्स, शास्त्रीनगर खोपोली, ता खालापुर, जि. रायगड यांच्याकडून घेवून कोरोना पेशंटच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ हजार रूपये प्रमाणे विकले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानुसार यापूर्वी नारायणगाव पोलिस स्टेशन मध्ये दाखल झालेला गुन्हा रजि.नंबर ९०/२०२१ मध्ये औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३ (२), (सी), जिवनावश्यक वस्तु अधिनीयम १९५५ चे कलम ७(१), (ए), (।।) औषधे व सौंदर्यप्रसाधणे कायदा १९४० चे कलम १८(सी), २७(बी)(।।), २८, २२ (१)(सीसीए) २२(३) प्रमाणे दाखल गुन्हयात या तिघांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यांना वरील गुन्हयामध्ये दिनांक २९/०४/२०२१ रोजी रात्री खोपोली येथुन ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडे याबाबत कसून चौकशी केली असता, सदरचे रेमडेसिवीर इंजेक्शन हे आम्हीच दिले असल्याचे त्यांनी कबूल केल्याने त्यांना गुरुवार दिनांक २९ रोजी रोजी अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या आरोपींना ५ दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे.

ही कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक धनंजय पालवे, पो.काॅ. शैलेश वाघमारे, पो.काॅ. सचिन कोबल यांच्या पथकाने केली आहे.
या गुन्हयचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.
चौकट…
दरम्यान या टोळीने किंवा अन्य व्यक्तिंनी अजून कोणाला रेमीडिसिवीर इंजेक्शन्सची अवैध विक्री केली असेल तर संबंधित व्यक्तिंनी नारायणगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी केले आहे.