धरमचंद फुलफगर यांनी वसतिगृहातील कोरोनाबाधित विद्यार्थीनिंना दहा दिवस जेवण पुरवत, अनोख्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा

  शिरूर येथील एक प्रसिद्ध सोन्याचे व्यावसायिक धरमचंद भवरीलाल फुलफगर हे आपल्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. शिरूर येथील विशेष मुलींच्या शासकीय वसतिगृहात नुकताच कोरोनाचा उद्रेक झाल्याची घटना घडलेली होती. त्यामुळे तेथील सर्व स्टाफ व विद्यार्थीनींच्या जेवणाची समस्या निर्माण झाली होती. ही गोष्ट धरमचंद फुलफगर, यांच्या कानावर काही पत्रकार व समाजसेवकांनी घालताच, त्यांनी येथील स्टाफ सह सर्व विद्यार्थिनी अशा सुमारे साठ जणांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची दहा दिवसांसाठी सोय करत, आपला वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करत, समाजात एक चांगला संदेश दिलाय. कारण आज काल आपण वाढदिवस साजरा करणाऱ्यांची एक नवीन पद्धत पाहत आहोत. पैशांची अमाप उधळण काहीजण करतात. परंतु जर प्रत्येकाने असा विचार केला, की आपण समाजाचेही काहीतरी देणे लागतोय, आणि ज्या ज्या वेळी समाजाला काही तरी देण्याची वेळ येते, त्या वेळी मी माघार घेणार नाही, असा विचार करणारे खूप कामी दानशूर असतात. परंतु आजच्या कोव्हीड रोगाच्या  साथीच्या काळात, अनेकांना मदतीची गरज आहे. फुलफगर यांनीही तीच भावना मनात ठेवत नेहमीच समाजसेवा केलीय.
  आंबेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त लोणी धामणी येथील तलाव बांधकामासाठी पंचवीस हजार रुपयांची मदत केलीय. या भागात कमी पाऊस पडत असल्याने येथील ग्रामस्थ व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी, तलाव बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यात, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, सचिव पिंटूशेठ पडवळ, महाराष्ट्र शासनाच्या ग्रहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, माजी सरपंच लंके, बाळासाहेब गायकवाड, मयूर लंके आदींचा पुढाकार आहे.

   तर तेथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या, भैरवनाथ विद्यालयाचे चेअरमन या नात्याने, फुलफगर यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याचे धुद्ध पाणी मिळावे, यासाठी RO प्लांट उभारणीला एक लाख रुपये देणगी स्वरूपात दिलेत.

 याशिवाय २०१९ च्या दुष्काळी परिस्थितीत उन्हाळ्यात सुमारे सोळा टँकरच्या साहाय्याने, शिरूर, आंबेगाव, पारनेर व श्रीगोंदयातील गरजू गावांना पिण्याच्या पाण्याची सुमारे अडीच महिने सोय करून दिलेली होती.
  तर, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी शिरूर, श्रीगोंदा व पारनेरमधील सुमारे अडीचशे कुटुंबांना एक महिन्याला पुरेल असे, किराणा साहì