महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा आलेख गेल्या काही दिवसांपासून स्थिरावला आहे ही दिलासादायक गोष्ट आहे. मात्र तरीदेखील कोणीही गाफील न राहता कोरोना संबंधित नियमांचे काटेकोर पालन करुन स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी -दि ३० एप्रिल २०२१
महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पिंपरी येथील जम्बो कोवीड-१९ सेंटरला तसेच ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील कोवीड- १९ रुग्णालयाला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा आणि माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

जम्बो कोवीड-१९ सेंटर येथील भेटीवेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त सुनिल अलमलेकर, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, जम्बो कोवीड रुग्णालयाचे समन्वयक डॉ. सुनिल पवार, व्यवस्थापक डॉ. संग्राम कपाले, प्रिती व्हिक्टर आदी उपस्थित होते. तर ऑटो क्लस्टर येथील कोवीड-१९ रुग्णालयाच्या पाहणी वेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे देखील उपस्थित होते.

कोवीड सदृश लक्षणे दिसत असतील अथवा कोवीड बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करुन निदान करणे गरजेचे आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यानंतर कोवीड बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे असे नमूद करुन खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येकाची देखील आहे. कोरोना बाधितांवर उपचार करताना रेमडेसीवीरचा अवाजवी वापर थांबवणे गरजेचे आहे. ज्या रुग्णांना त्याची आवश्यकता आहे अशा योग्य रुग्णांना रेमडेसीवीर दिले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रेमडेसीवीरची वितरण प्रणाली योग्य पध्दतीने कार्यरत आहे. रेमडेसीवीर कशा पध्दतीने उपलब्ध होते याची माहिती करुन दिल्यास नागरिकांची धावपळ होणार नाही. जम्बो कोवीड-१९ सेंटरच्या माध्यमातून जवळपास ८०० पेक्षा अधिक रुग्णांना सेवा देणे ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. महापालिकेने येथील व्यवस्थापनाचे उत्तम पध्दतीने नियोजन केले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे समूपदेशन करुन त्यांना दिलासा देण्याचे काम देखील महापालिका करीत आहे, असे डॉ. कोल्हे म्हणाले. यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून सेवेबद्दल विचारणा केली. संकटाच्या काळात डॉक्टरांनी नागरिकांच्या हिताचा विचार करुन सेवा द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील कोवीड-१९ वॉररुमला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. होम आयसोलेशनमधील कोरोना बाधित रुग्णांना माहिती पत्रक स्वरुपात नियम, पथ्य, उपचार, हेल्पलाईन आदीं बाबत अवगत केले जावे अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली.
त्यानंतर कै.मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना म्हणाले रेमडीसीवीर हे पूर्ण उपाय नसून ज्या रुग्णाला गरज आहे त्यांनाच द्यावी. विरोधक म्हणतात की तुम्ही शिरूर मतदार संघात जाऊन ग्राउंडर काम करताना दिसत नाहीत. मतदारांना भेटत नाहीत यावर बोलताना म्हणाले की कोण्ही काहीही म्हणू द्या
मला जे नागरिकांसाठी वाटते ते मी करतो जर असे असते तर मी कालच फेसबुक ला कोरोना विषयी ची कशी काळजी घ्यावी तो व्हिडीओ उपलोड केला त्याला 3 .5 लाख लोकांनी पहिला मी अशाप्रकारे जनजागृती करतो कोणाला काय म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्पर्श हॉस्पिटलमधील प्रकरणात तुमच्या पक्षाची एक नगरसेविकेचे नाव घेतले जाते काय सांगाल त्याविषयी बोलताना म्हणाले जर कोण्ही मेलेल्या मढयावरच्या टाळू चे लोणी जर कोण्ही खायचा प्रयत्न करत असेल तर यात कोण्हीही व कोणत्याही पक्षाचे असले तरी कोणाचीही गय केली जाणार नाही.

वाररूम पाहणी करतेवेळी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे आयुक्त राजेश पाटील, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य शाम लांडे, पंकज भालेकर, समाज सेवक अमोल हरपळे , आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्रिस्टोफर झेवीअर, डॉ. अभिजित सांगडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *