माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ करताहेत काळ्या आईची सेवा…!

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
पुणे जिल्ह्याचे लोकनेते,मुळशीचे चारित्र्यसंपन्न व सुसंस्कृत नेतृत्व माजी रणजीपटू, मा.खा.अशोकरावजी मोहोळसाहेब यांच्याविषयी …. अण्णासाहेब सन १९८५ ते १९९७ पर्यंत मुळशी-प.हवेली विधानसभेचे आमदार असताना या मतदारसंघामध्ये बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवून मतदारसंघ टँकरमुक्त केला. सन १९९८ ते २००४ पर्यंत दुर्गम अशा खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार असताना या दुर्गम भागाचा शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक विकास केला. पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे १० वर्षे चेअरमन पदाची कारकिर्द नव्या पिढीला दिशा देणारी असून दैदिप्यवान आहे. त्यांच्या चेअरमन पदाच्या काळात दूध संकलन ३० हजार लिटरवरुन ५ लाख लिटरपर्यंत वाढ झाली. वरवंड, पाईट, अवसरी येथे चिलींग प्लँट सुरु केले. संघाची ५ कोटीवरुन १०० कोटींवर उलाढाल करण्यात यशस्वी ठरले. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे २ वर्षे चेअरमन व १० वर्षे संचालक होते. चेअरमन पदाच्या काळात सध्या बँकेच्या मुख्यालयाची जागा मिळवून दिली. अशी निस्वार्थी जनतेची सेवा करणारा लोकनेता. या वयातही बळीराजाप्रमाणे काळ्या आईची सेवा करीत आहेत.या गोष्टीचा आम्हांला अभिमान आहे असे मनोगत अण्णांचे चाहते व्यक्त करत आहेत.
अलीकडच्या काळातील स्वयंघोषित सहकारमहर्षी, आजीमाजी आमदार, खासदार, मंत्री व लोकप्रतीनिधी भ्रष्टाचार केल्यामुळे न्यायालयाच्या वारी करीत आहे