काळुसगावामधे ग्रामपंचायत मार्फतआयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

राजगुरूनगर दि 10 सप्टेंबर 2021

प्रतिनिधी -अक्षता कान्हूरकर

यामध्ये प्रामुख्याने मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह ,रक्तदाब ,महिलांचे तपसणी व मार्गदर्शन आवश्यक उपचार असे शिबिर राबविण्यात आले .

शेकडो रूग्नांनी चेकअप करून तसेच वृदध लोक विशेषतः महिला मंडळ यांनी या शिबिराचा लाभ घेतला, तसेच
ऑनलाईन दिव्यांग युनिक फॉर्म नाव नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता . यामध्ये त्यांना यूनिक कार्ड देवून बस रेल्वेसेवा व अपंगाचा विवीध योजनांचा लाभ मिळेल अशी जनजागृती देखील करण्यात आली , सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभाग काळूस यांनी विशेष प्रयत्न केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *