शहरातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयातील तत्काळ फायर व्यवस्थेचे फायर ऑडीट करावे- नाना काटे माजी विरोधी पक्षनेते…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :-दि २३ एप्रिल २०२१
काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयाला आग लागून ११ जणाचा दुर्दयी मृत्यू झाला होता, तसेच काल वसई विरार येथील विशाल वात्सल्य या रुग्नालयला लागलेल्या आगीत १३ जणांचा दुर्दयी मृत्यू झाला ही गोष्ट खूप गंभीर आहे, शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या प्रचंड वाढू लागली आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेने प्रचंड ताण आलेला आहे. तसेच बहुतेक रुग्णालयांनी आपल्या रूग्णालयाचे कोविड सेंटर रूग्णालयात रुपांतर केले आहे. ज्या ठिकाणी व्हेन्टिलेटर, आय.सी.यु चालु आहे तेथे कायम स्वरूपी एसी चालु ठेवला जातो त्यामुळे तेथील एसी व इतर वातानुकुलीत उपकरणाच्या दुरूस्तीकडे काही खासगी रूग्णालये दुर्लक्ष करीत आहे ही. याचा विचार करता अग्निशमन विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खासगी व सरकारी छोट्या मोठ्या रुग्णालयाचे फायर व्यवस्थेचे फायर ऑडीट करण्यात यावे, तसेच या पाहणीमध्ये ज्यांनी योग्य उपाययोजना केल्या नसतील त्यांना योग्य उपाययोजना करण्यास सांगण्यात यावे किवा काही गंभीर त्रुटी आढळ्यास रूग्णांचा जिवाशी खेळणाऱ्या त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तरी मा. आयुक्त महोदय वर नमूद केलेली बाब ही खूप गंभीर असून आपण तात्काळ याची दाखल घेवुन फायर व्यवस्थेचे फायर ॲाटीड करण्याचे आदेश देण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *