गदिमा जीवनगौरव सन्मान २०२० उल्हासदादा पवार यांना जाहीर
रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक
पिंपरी (दिनांक : १३ डिसेंबर २०२०)
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी, गीतकार, कविवर्य गदिमा जीवनगौरव सन्मानासाठी यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्याचे व्यासंगी अभ्यासक उल्हासदादा पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

गेली २७ वर्षे पिंपरी – चिंचवड येथे गदिमा कविता महोत्सव साजरा करण्यात येत आहे, या वर्षीचा गदिमा कविता महोत्सव सांगली जिल्ह्यातील माडगूळ, तालुका आटपाडी येथे गदिमांच्या जन्मगावी लवकरच संपन्न होणार असून यापूर्वी आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, चित्रपट दिग्दर्शक राजदत्त इत्यादी मान्यवरांना गदिमा जीवनगौरव सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.


गदिमा १०१ वी जयंती आणि ४३ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पुणे विभागाचे राजेंद्र वाघ आणि पिंपरी-चिंचवड विभागाचे सुरेश कंक यांनी कळवली आहे.