पिंपरी चिंचवड शहरातील कोविड रुग्णांबाबत जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या ऑक्सिजन व रेमडिसिवर पुरवठ्या बाबत होणारा दुजाभाव त्वरित थांबवा-मारुती भापकर

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २० एप्रिल २०२१ पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये पुणे जिल्हा प्रशासन दुजाभाव करीत असून शहरासाठी पाठवलेल्या ऑक्सिजन टँकर ऐनवेळी पुण्याकडे वळविण्याचा प्रयत्न आमदार महेश लांडगे व मनपा अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. पिपरी चिंचवड शहरातील रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयासाठी आणलेला ऑक्सिजनचा एक टँकर काल (सोमवार )पिंपरी-चिंचवड दिला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा प्रशासनाने ऐनवेळी ऑक्सीजन टँकर न देण्याचा निर्णय घेतला. याबाबत आमच्या शहरातील लोकप्रतिनिधींनी विनवणी करण्यासाठी संपर्क केला. मात्र त्याला जिल्हा प्रशासनाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. रेमंडिसिवर इंजेक्शनच्या बाबत हि अन्न व औषध प्रशासन विभाग पिंपरी-चिंचवड करांशी असाच दुजाभाव करीत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आज रात्री (मंगळवार) पुरेल इतकाच ऑक्सिजन खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर ऑक्सिजन बेडवर असलेले शेकडो रुग्ण दगावण्याची भीती आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून याबाबत योग्य नियोजन करून पिंपरी-चिंचवडकरांच्या बाबत अशा प्रकारचा दुजाभाव सहन केला जाणार नाही. याची आपण गंभीरपणे नोंद घ्यावी. असा इशारा विभागीय आयुक्तांना दिला आहे. जर पुणे जिल्हा प्रशासन,महाराष्ट्र शासन यांच्याकडून झालेल्या या चुकांमुळे आमच्या शहरातील नागरिकांना प्राण गमवावे लागले तर त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाची असेल असे मारुती भावकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्याची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *