आज पासून तासगाव शहरासह तालुक्यात कड़क लॉकडाउन-पोलिसांना सहकार्य न केल्यास गुन्हे दाखल करणार पोलीस निरीक्षक संजीव झाडे

तासगाव,20 एप्रिल

प्रतिनिधी, राजेंद्र थोरात

तासगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण जास्त वाढू लागल्यामुळे तालुक्यातील व शहरातील सामान्य नागरिक हतबल झाले होते.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बोलताना सांगितले की कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकार व सांगली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी साहेब यानी अध्यादेश काढला. दिनांक 21 पासून ते 1 मे पर्यत जीवनावश्यक दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंत सुरू राहतील त्यानंतर सर्वांनी दुकाने बंद करायचे आहेत पोलिसांना जर सहकार्य करत नसाल तर कोणाचीही गय न करता गुन्हे दाखल करणार असेही पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. तर काल रात्री पोलीस निरीक्षक संजीव झाडे स्वतः रस्त्यावर उतरून मोटरसायकली ताब्यात घेऊन कारवाई करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *