वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये म्हणून राष्ट्रवादी पदवीधर संघाकडून आयुक्तांना निवेदन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :- दि १३ मार्च २०२१
कोरोणा रोगाचे थैमान सुरू असताना पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या दवाखान्यात नर्सचा तुटवडा जाणवू लागला. पालिकेने मग तात्पुरत्या स्वरुपात आदेश क्रमांक ७/कवि/१४७३/२०२० नुसार काही नर्सची भरती केली. या नर्सनी सुद्धा आपला जीव धोक्यात घालून हजारो कोरोना रुग्णांची सेवा केली.
पण मार्च १६ तारखेला त्याची मुदत संपत आहे. गेल्या आठवडाभरात शहरात रोज पाचशेच्या वर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
अशावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा पडू नये म्हणून राष्ट्रवादी पदवीधर संघ पिंपरी चिंचवड तर्फे आयुक्तांना भेटून या नर्सेसना त्यांचा कालावधी वाढऊन द्यावा ,त्यांचे वेतन आहे तेच ठेवावे ही विनंती करण्यात आली. वैद्यकीय कर्मचारी कमी असतील तर कुणाचा जीवही जाऊ शकतो असे रोहिणी वारे आयुक्त राजेश पाटील यांच्याशी बोलताना म्हणाल्या.

यावेळी नर्स रविना राठोड,दीक्षा बर्वे,श्रद्धा निकम , सोनाली ननावरे , प्रतिमा म्हस्के , वैजयंती तडवी , अविनाश कोकाटे, वृषाली क्षीरसागर,अरुण गरकल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष संतोष वाघेरे,राष्ट्रवादी व्यवस्थापन समिती अध्यक्ष शक्रूल्ला पठाण , पदवीधरचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष सूप्रीत जाधव , कार्याध्यक्ष युनूस शेख आणि राष्ट्रवादी पदवीधर संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष माधव पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *