लांडेवाडी पिंगळवाडी येथे लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

लांडेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
लांडेवाडी पिंगळवाडी तालुका आंबेगाव येथे ग्रामपंचायत लांडेवाडी  पिंगळवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र नारोडी यांच्या संयुक्त विद्यमाने   सोमवार दिनांक १२ /०४ /२०२१ रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला ,एकूण १३७  नागरिकांना co-vaxin ही  कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे गावच्या सरपंच कु श्रद्धाताई शंकर भवारी यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले. त्यांना ग्रामपंचायत सदस्य सौ उज्वला भवारी, श्री प्रशांत डगळे, आशा सेविका चंदाताई भोकटे यांनी सहकार्य केले.

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.श्री राजेश लांघी (सी आय डी पुणे),  माजी उपसरपंच श्री गणपत भवारी, श्री संभाजी डगळे साहेब, श्री प्रविणशेठ कोकणे, ग्रामसेविका ज्योती मोरडे मॅडम, कर्मचारी  दिनकर पिंगळे  व जि. प. शाळा पिंगळवाडी मुख्याध्यापक श्री पडवळ सर यांनी सहकार्य केले.
             कार्यक्रमाच्या वेळी श्री शंकर भवारी (सहायक पोलीस निरीक्षक ) श्री गणेश हुले पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य नारोडीचे डॉ भागवत, डॉ लहाने, डॉ ए हुले, डॉ अढवळे मॅडम उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *