आयुक्त राजेश पाटील यांचा दणका अतिरिक्त आयुक्त २ अजित पवार यांना केले कार्यमुक्त..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि ७ एप्रिल २०२१
पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी आज धडाकेबाज निर्णय घेऊन सर्वानाच अचंबित करून स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवण्यास सुरुवात केली आहे.

         सर्व साधारण सभेत विरोधकांबरोबर सत्ताधार्यांनीही   वेगवेगळ्या विषयात विशेषतः कोरोनाबाबत  सर्वात गाजलेला  स्पर्श घोटाळा असो की इतर विषयाबाबत ज्यांच्यावर हल्लाबोल केला. ते अतिरिक्त आयुक्त २ अजित पवार यांना महापालिका सेवेतून आज बुधवार दि ७ एप्रिल रोजी  कार्यमुक्त करण्यात आले.  

अजीत पवार पालिकेत रुजू झाल्यापासूनच विविध कारणांनी चर्चेत राहिले होते. ते माजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मर्जीतील अधिकारी होते असे बोलले जाते. पण स्पर्श सारख्या विषयात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर त्यावेळचे आयुक्त श्रावण हर्डीकर 3 कोटीं 14 लाखांची ची बिले अदा केल्यानंतर उर्वरित रक्कम अदा करू नये व या विषयाची कसून चौकशी व्हावी असा खुंटा ठोकून गेले.

कोरोना काळात कोविड केअर सेंटरला दिलेल्या जादा बिलांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक माजी महापौर योगेश बहल यांनी पत्रकार परिषद घेऊन केले होते. अतिरिक्त आयुक्त २ अजित पवार यांना सेवेतून कार्यमुक्त करताना करोना काळात स्पर्श हाॅस्पिटलमधील भ्रष्टाचार आणि शासनाने नियमित अथवा अतिरिक्त पदभाराबाबत कोणतेच आदेश न दिल्यामुळे आपण कार्यमुक्त करत असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे .तसेच त्यांचे सर्व आर्थिक अधिकारही काढून घेण्यात आले .

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पवार यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली होती . ही नेमणूक दोन वर्षे कालावधीसाठी होती . ५ सप्टेंबर २०१९ रोजी ते महापालिकेत रूजू झाले होते.

मात्र कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना स्पर्श हॉस्पिटलला पवार यांच्या आदेशावरून 3 कोटी 14 लाख रुपयांची बिले अदा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला . तसेच त्यांच्या कार्यशैलीवर आणि नेमणुकीवर विविध आक्षेप घेण्यात आले . या पार्श्वभुमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी पवार यांना महापालिका सेवेतून आज कार्यमुक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *