प्रतिनिधी जुन्नर,दि.19 मार्च 2021
जि.प.प्राथमिक शाळा अलदरे च्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तका बरोबरच संगणक प्रशिक्षण देणे हि काळाची गरज गरज आहे. आणि त्यासाठी प्राथमिक शाळेमध्य एक आधुनिक संगणक प्रशिक्षण कक्ष असणे गरजेचे आहे. हि गरज ओळखून आलदरे गावाचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे चेअरमन संतोष सरजिने, म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.सचिन सरजिने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.विनायक सरजिने ,माजी सरपंच श्री.निलेश सरजिने, पोलीस पाटील श्री. सुमित लोहोटे व सर्व सहकारी यांनी पीडीसीसी बँक/ सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्री.संजयशेठ काळे यांच्याकडे पाठपुरावा केला. यानंतर मा. श्री.संजयशेठ काळे यांच्या पुढाकाराने 50,000/- ( रूपये पन्नास हजार ) चा निधी हा चेक स्वरूपात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलदरे यांच्या नावे देण्यात आला आहे.
याकामी पीडीसीसी बँकेचे उपविभागीय अधिकारी माननीय कवडे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा अलदरे चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यावतीने पीडीसीसी बँक/ सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मा. श्री.संजयशेठ काळे यांचे आभार मानले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उत्तम आरोटे सर यांनी या पैश्यांचा विनियोग अत्याधुनिक संगणक लॅब उभारण्या करिता करून सुसज्ज संगणक लॅब उभारून विद्यार्थ्यांना स्वतंत्र संगणक शिक्षकाद्वारे संगणक शिक्षण देणे व नियमित अध्ययन -अध्यापनातही संगणकांचा उपयोग करण्यासाठी करण्यात येईल असे सांगितले. यावेळी चेक स्विकारताना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सल्लागार सुभाषराव कवडे तसेच विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, जि.प.प्राथ.शाळा अलदरे कमेटी अध्यक्ष विनायक सरजिने, अलदरे विका सोसा.लि.चे चेअरमन संतोष सरजिने,ग्रामपंचायत सदस्य व मा.सरपंच निलेश सरजिने, पोलीस पाटील सुमित लोहोटे, ग्रामदैवत म्हसोबा महाराज ट्रस्ट अध्यक्ष सचिन सरजिने,शालेय समिती सदस्य अजित सरजिने, आगर वि.का.सोसा लि.चे सचिव प्रसाद राऊत,धिरज सरजिने उपस्थित होते.