प्रतिनिधी
भोसरी – दि १८ मार्च २०२१
जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने भोसरी येथे सकारात्मक व निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कार आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलसिह परदेशी यांना स्मृतिचिन्ह , शाल , पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे व त्यांच्या सहकार्याच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अतुलसिह परदेशी म्हणाले पुरस्कार , सत्कार हा एक आपल्या केलेल्या कार्याचा भाग असतो. समाज्यात आपल्या कार्याची दखल घेऊन सामाजिक संस्था हा पुरस्कार देऊन आपल्या कार्यास अधिक बळकटी यावी म्हणून हा पुरस्कार देत असतात. असे असले तरी आजचा जो हा पुरस्कार आपल्या घरात होत असून व मंडळाने माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी आभारी आहे. या मंडळाचे काम कौतुकास्पद असून सामाजिक कार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असणारे हे मंडळ आहे. लेण्याद्रीच्या कोविड सेंटर ला देण्यात आलेली भरीव मदत असो की कोरोनाकाळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेले अभिमानास्पद काम असो. असेच काम भविष्यात सुरू ठेवा आपला आवाज सदैव आपल्या सोबत असेल असे सांगितले.
मंडळाचे मार्गदर्शक निवेदक, व्याख्याते भाऊसाहेब कोकाटे यांनी आपला आवाज चे मुख्य संपादक अतुलसिह परदेशी आणि आपला आवाज विषयी व मंडळा विषयी माहिती दिली अतुल परदेशी यांच्या विषयी बोलताना म्हणाले कर्तृत्ववान माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळते व दातृत्वाची त्याला जोड लागते. जुन्नर तालुक्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे जर तालुक्यातील एखादा माणूस उंचीच्या शिखरावर पोहचला तर त्याची दखल हे मंडळ नेहमीच घेत असते. सध्या आपला आवाज हे वेगळ्या उंचीवर असणारे न्यूज चॅनल असून कोरोनाच्या काळात तुमच्या टीमने जे काम केले ते सहारनीय आहे आज तुम्हाला आम्ही येथे सन्मानित करत आहोत पण उद्याच्या काळात आपल्या कर्तृत्वाने आपणास दिल्लीमध्ये पुरस्कार मिळावा हीच अपेक्षा करतो. येणाऱ्या काळात आपण एकमेकांच्या हातात हात घालून काम करू या असेही बोलताना म्हणाले.
अध्यक्ष प्रभाकर ढोमसे आपल्या मनोगतात म्हणाले जुन्नर वरून सुरू झालेले आपले चॅनल पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झाले तेव्हा योग्य माणसांची निवड करून आपला हा प्रवास सुरु केला व आज वेगळ्या उंचीवर हे न्यूज चॅनल असल्याचे पाहायला मिळते त्याचा आनंद आम्हास आहे. आपली सलग तिसऱ्यांदा इलेकट्रॉनिक मीडियाच्या पुणे जिल्हापदी निवड झाल्याचा आम्हास अभिमान आहे. भविष्यात अजून उंचीवर जावो याच आपणास सदिच्छा.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके यांनीही आपले मनोगत वेक्त करताना आपला आवाज च्या कार्याचा आलेख मांडला व माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असावेत व तसे अतुलसिह परदेशी आपण अहात कारण तुम्ही आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांची किती काळजी घेता हे आम्ही कोरोना काळात झुंज देणाऱ्या आमचे मित्र रोहित खर्गे यांची काळजी किती व कशी घेतली हे पहिले आहे. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा. योगेश आमले बोलताना म्हणाले खरी व निर्भीड पत्रकारिता काय असते हे मी आमच्या डिंगोरे गावात दारूबंदी विषयी घडलेल्या प्रसंगातून सांगितली व त्यावेळी आपला आवाजने पुढे येऊन निर्भीडता व सकारात्मक बातमीदारीचे दर्शन घडविले.
कोरोना काळात अतिशय चांगले कार्य केल्याबद्दल आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलसिह परदेशी यांच्या हस्ते कोरोनायोद्धा पुरस्कार अण्णा साहेब मटाले , दीपक सोनवणे व रोहित खर्गे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी
बाळासाहेब वाळुंज, नितीन शिंदे, शशिकांत आरोटे, ऍड संतोष पाचपुते, उल्हास पानसरे , विजय ढगे, यांनी मोजक्या शब्दात आपली मनोगते वेक्त केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक बबनशेठ मुटके, उत्तमदादा महाकाळ , भाऊसाहेब कोकाटे, उल्हास पानसरे, दीपक सोनवणे,सुनील पाटे, विजय ढगे, नितीन शिंदे, स्वप्नील पोखरकर, इंद्रजित पाटोळे , राहुल वाळुंज , तेजस गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन ऍड संतोष काशीद यांनी केले तर आभार अण्णा मटाले यांनी मानले.