शिरूर गोळीबार प्रकरणातील NK साम्राज्य ग्रुपचा कुख्यात मोक्यातील आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

शिरुर पो. स्टे. गु. र. नं. ५९/२०२१ भा. द. वि. का. क. ३०७, १२०(ब) इतर सह मौका ऍक्ट प्रमाणे दाखल असलेने, सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथकाकडून करणेत येत होता. सदरच्या गुन्हयातील आरोपी नामे – १) बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप, हा इसम नामे प्रसाद सुनील यादव रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड पुणे यांचेकडे राहणेस असून त्याने त्याला आसरा दिला आहे, अशी खात्रीशीर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. गुप्त माहितीचे आधारे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर पथकाने इसम नामे प्रसाद सुनील यादव यास भेटून त्याचेकडे चौकशी केली असता, आरोपी नामे बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कूर्लप हा नमुद गुन्ह्यात फरार असल्याचे माहिती असताना देखील, प्रसाद सुनील यादव याने आरोपीस गुन्हा घडलेनंतर फरार राहणेसाठी त्याचे घरी आसरा देवून सहाय्य केले होते व सध्या प्रसाद सुनील यादव याने, आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कूर्लप याला शेजवळ पार्क, चंदननगर पुणे येथे प्रसाद सुनील यादव व बाबु उर्फ मुकेश कुर्लप या दोघांच्या मित्राचे खोलीत आसरा देवून लपवून ठेवले असून, आरोपी बाबू उर्फ मुकेश कुर्लप हा गुन्ह्यामध्ये फरार असून त्याला आसरा देवून लपवून ठेवा असे त्यांचे मित्रांना सांगितले असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने चंदननगर शेजवळ पार्क परीसरातील लतिका निवास इमारतीत
आरोपी नामे –

1) बाबु उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप, वय 31 वर्षे , रा.कामाठीपुरा, शिरूर ता. शिरूर जि.पुणे,
या आरोपीवर पुढील गुन्हे दाखल आहेत –
1) शिरूर पो. स्टे. Cr. no.33/2013, IPC 307, 341, 141, 142, 143, 147, 148, 504, 506.
2) शिरूर पो. स्टे. Cr. no 355/2013, IPC 326, 143, 147, 149, 504, 506.
3) शिरूर पो. स्टे. Cr. no. 59/2021, IPC 307, 143, 147, 148, 149, 341, 120(B), 109, Arm Act 3, 4, 25, 27 सह
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (ii), 3 (4).

२) बाबु उर्फ परशुराम मन्छिद्र म्याकल, वय २१ वर्षे रा. कामाठीपुरा, शिरूर ता. शिरूर जि. पुणे.
या आरोपीवर पुढील गुन्हे दाखल आहेत.
1) हडपसर पो. स्टे. Cr. No 337/2019, IPC 399, 402, म. पो. का. क. 37(1)(3), 135, Arm Act 3, 4, 25.