खराळवाडी गावठाण येथे लवकरच सुरू होणार जेष्ठ नागरिकांसाठी कोविड १९ लसीकरण केंद्र

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी:- दि १९ मार्च २०२१
सध्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची दुसरी लाट जोरात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले असून , खराळवाडी प्रभाग क्र ९ मधील कामगार नगर , गांधीनगर, बजरंग नगर , आत्मानगर हा जवळपास पन्नास हजाराच्या जवळपास लोकवस्तीचा भाग असून येथील जेष्ठ नागरिकांना यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये जावे लागते तेथे तासनतास रांगेत उभे रहावे लागते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मधील आरोग्य कर्मचार्‍यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेता खराळवाडी गावठाण येथे covid-19 लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे सामाजिक कार्यकर्ते पै.संतोष चांदेरे मंडळाचे संयोजक सोमेश चव्हाण, प्रदीप कलापुरे, आशिष तरडे, संदीप जाधव यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पावन साळवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आम्ही येत्या काही दिवसात कोरोना लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र खराळवाडी येथे सुरू करू असे आश्वासन डॉक्टर साळवे यांनी दिले.