महिला कणखर-निडर-वास्तवि-लढवय्यी अशी वेगळी कहाणी असणारी शिरूर शहरातील आई-माता-जननी..!
सुलभा कोतवाल नावाची असलेली महिला गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मापासून ते आजपर्यंत संघर्ष यात्रा करत आपल्या संसाराचा गाडा अगदी प्रामाणिकपणे,निधड्या छातीने,समाजात अनेक हाल अपेष्टा सहन करत आपल्या पोटी जन्माला 3 मतिमंद मुलांचा सांभाळ करत गेल्या 35 वर्षांपासून जीवनाचा संघर्ष करत आहे. या तीन लेकरांना मायेची ऊब देत अनेक संकटांना सामोरे जात आपल्या आयुष्याचा गाडा ओढत आज इथपर्यंत पोहचल्या आहेत.
यात 1 मुलगा चांगला शिक्षित करून आपल्यावरती असलेली जबाबदारी याची जाणीव करून देत आपल्यावर परमेश्वराने सोपवलेली जबाबदारी कशा पद्धतीने पार पडायची याचे संस्कार देत आज तो ही आईच्या हातात हात देऊन त्या 3 मुलांचा सांभाळ योग्य पद्धतीने करत आहे..नव्याने घरात आलेली सून तिला ही परिस्थितीची जाणीव होत यांचे साठीच आपले संपूर्ण आयुष्य असल्याचे समजून घेत याचे सोबत तीही लक्ष्मी आपल्या परीने योग्यरीत्या त्यांची देखभाल करत आहे..!
या कुटुंबाबद्दल सांगावे तेवढे कमीच आहे,याच निमित्ताने व महिला दिनाचे औचित्य साधित या अबोल-कर्तृत्ववान-हिरकणीचा छोटासा सन्मान व त्यांच्या कुटुंबीयांचा एक भाग होण्याचे भाग्य आमच्या पदरी पडले..!त्यानिमित्त या आईचा छोटासा सन्मान वेल्फेअर फाउंडेशनच्या पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आला..! यावेळी
सचिव नम्रता गवारी, पुष्पा जाधव,नगरसेविका,संगीता मल्लाव, मनीष वाळुंज,मनीष सोनवणे,गणेश कचरे आदी उपस्थित होते