वायसीएम रुग्णालयात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया…गोर-गरीब रुग्णांना उपचारासाठी वायसीएम ठरले वरदान..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :- १० मार्च २०२१
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात लाखो गोर-गरीब रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. पुणे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णांनी आतापर्यंत या सेवेचा लाभ घेतला आहे. येथील उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर आजारातून मुक्त झाले आहेत. तसेच दहा लाखात 1.7 टक्के रुग्णांना जबड्याचा अमिलोब्लास्टोमा हा दुर्मिळ आजार होतो. या आजाराची 55 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती, वायसीएम रुग्णालयाचे दंत चिकित्सक विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी दिली.


रुग्णालयात विविध अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया विभाग आहेत. यापैकी दंत चिकित्सा विभागात फेब्रुवारी महिन्यात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर 55 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले असून एक महिन्यांच्या उपचारानंतर ती आजार झाला होता. अनेक खासगी रुग्णालयात उपचार घेतले परंतु त्यावर खात्रीशीर उपचार झाला नाही. जबड्याचे हाड कुजत चालल्याने दाताने अन्न चावतानाही वेदना होऊ लागल्या. शेख याना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपयांचा खर्च सांगितला. त्यांचे पती खासगी सफाई कर्मचारी म्हणून अल्प मानधनावर काम करतात. त्यामुळे हतबल झालेल्या शेख यांच्या पतीने वायसीएम रुग्णालयातील दंतचिकित्सा डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा निर्णय घेतला. तपासणीनंतर दंत चिकित्सा विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी जबड्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात शेख यांच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून खालच्या जबड्याची कुजलेली हाडे काढून घेतली व टायटेनियम धातूच्या पट्टीचे रोपण केले. त्यानंतर रुग्णालयात एक महिना उपचार केले. शेख सध्या ठणठणीत असून त्यांना कोणताही त्रास नाही. असा आजार दर दहा लाखात 1.7 टक्के लोकांमध्ये आढळतो आणि हा आजार स्थानिकदृष्ट्या घातक असल्याने जबड्याचे हाड कुजत जाते. त्यामुळे दुर्मिळ आजारावर कोणताही खर्च न होता यशस्वी उपचार झाल्याने शेख यांनी समाधान व्यक्त करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. दंत चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांच्या समवेत डॉ. दीपक पाटील, डॉ. श्रीनिवास, डॉ. अजिंक्य, डॉ. श्रद्धा म्हस्के यांनी सहकार्य केले. यासाठी डॉ. तुषार पाटील पॅथॉलॉजी विभागप्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *