धुळे । महीला दिनानिमित्त विधवा महीलेस छोटा व्यवसाय सुरू करून देऊन सौ गीतांजली कोळी यांचा आधार…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

आज दि. ७ मार्च २०२१
महिला दिनाच्या पुर्व संध्येला महिलांचा खरा सन्मान धुळे येथील वर्शी गावात झाला…
गेल्या दिड वर्षापूर्वी अतिदारू सेवनाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वर्षी गावातील हिम्मतराव कोळी यांचा मृत्यू झाला… त्यांच्या आई वडीलांचाही यापूर्वी मृत्यू झाला आहे अशा परिस्थितीत मयत हिम्मतराव यांची पत्नी मिनाबाई कोळी यांच्या वर दुखाचे आभाळ कोसळले अतिशय प्रतिकुल परीस्थितीत तीन लहान मुले यांना घेऊन उदरनिर्वाह कसा करायचा मोठा प्रश्न मिनाबाई यांच्या पुढे होता तशाही परीस्थितीत त्या अशिक्षित शेतमजुरी ला जाण्याशिवाय पर्याय नाही परंतु मुले अगदी लहान त्यांमुळे त्यांना घेऊन कसेतरी त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे …
दारूबंदी जनजागृती करण्यासाठी सौ गीतांजली कोळी या वर्षी गावात आल्या असतांना गीतांजली कोळी यांनी मिनाबाई कोळी यांना स्वताचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले…
व त्यांचा हा व्हिडिओ जळगाव येथील समाज सेवक श्री अनील नन्नावरे यांनी तात्काळ फोन वर संपर्क साधून आज प्रत्यक्ष सौ गीतांजली कोळी व श्री धनराज साळुंखे यांच्या सोबत येऊन मिनाबाई यांना चार हजार रुपये खर्चून वजन काटा, बोंबील, झिंगे, हा माल स्वतः उपलब्ध करून देऊन रोजच्या उदरनिर्वाह साठी छोटासा व्यवसाय टाकून दिला…तसेच महीन्याचा किराणा सुध्दा भरून दिला.. हे पाहून मिनाबाई यांच्या सह आम्हा सर्व महीलांचे मन भरून आले…आमच्या या बांधवांचा मनापासून अभिमान वाटला … हा खरा महीलांचा सन्मान आहे यावेळी वर्शी गावातील मिनाबाई यांच्या घराजवळच्या सर्व महीलांनी श्री नन्नावरे साहेबांचे आभार मानले…
म्हणून च म्हणावेसे वाटते …

आभाळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडे तरी खाली पहावे ज्यांचे जन्म मातीत गेले त्यांना ही थोडे उचलून घ्यावे…
महिला दिनाच्या आपला आवाजकडून मनस्वी शुभेच्छा