वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्या बाबत,महावितरण विभाने तातडीने घेतली सर्वपक्षीय मोर्चाची दखल -ॲड.अविनाश रहाणे

आंबेगाव
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे यांनी वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि.७ ऑगस्ट २०२३ रोजी मंचर विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मोर्चा ची दखल घेत.विज वितरण कंपनी चे कार्यकारी अभियंता श्री शांताराम बाऺगर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवार दि.३१ जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे यांच्या मंचर लक्ष्मी रस्त्यावरील संपर्क कार्यालयात भेट घेऊन वीज ग्राहकांच्या समस्या समजावून घेतल्या.

यावेळी विज वितरण कंपनी चे सहाय्यक कार्यकारी अभियंता सुधीर पन्नीकर,उप कार्यकारी अभियंता अनिल डोंगरे यांनी चर्चा केली.या बैठकीत जेष्ठ शिवसैनिक शिवकल्याण पतसंस्थेचे व्हाईसचेअरमन रऺगनाथनाना थोरात, विभागप्रमुख विजय जाधव, खादी ग्रामोद्योग सऺघाचे माजी चेअरमन राजु सोमवऺशी, वहातुक सेनेचे तालुकाप्रमुख संजय चिऺचपुरे, महिला आघाडी मंचर शहर प्रमुख सौ.सुवर्णा डोंगरे, युवासेना तालुका चिटणीस महेश घोडके इत्यादींनी चर्चेत भाग घेतला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सर्व पक्षीय मोर्चात आम आदमी पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय किसान सभा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना इत्यादी पक्षाचे नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *