महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे काम उल्लेखनीय- आदेश बांदेकर…

ठाणे प्रतिनीधी
07/03/2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्यातील पत्रकारांसाठी करत असलेले काम हे उल्लेखनीय असून आज पर्यंत पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक पत्रकार बांधवांच्या समस्याना न्याय देत पत्रकार संघाने खंबीर पाठबळ दिले आहे अशा शब्दांत होम मिनिस्टर फेम भाऊजी सिद्धिविनायक गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी भावना व्यक्त केल्या…

ठाणे येथील गडकरी नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव विश्वासराव आरोटे यानी सदिच्छा भेट घेत त्यांचा सत्कार केला यावेळी फुल टु धम्माल या चित्रपटातील सिनेअभिनेत्री सुचित्रा बांदेकर व पत्रकार उपस्थित होते…