”म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) २०२०” मध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात चौथे…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. ४ मार्च २०२१
नागरिकांना त्यांच्या महानगरपालिका क्षेत्रात उत्तम दर्जाचे व योग्य राहणीमान निर्माण व्हावे या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ”म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) २०२०” मध्ये पिंपरी चिंचवड शहराने देशपातळीवर चौथे स्थान पटकावले आहे. म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) २०२० ठरवताना, कोणत्याही शहराचा महत्वाचा आधार स्तंभ असणाऱ्या गव्हर्नन्स म्हणजेच प्रशासकीय कारभार या निकषासाठी पिंपरी चिंचवड शहर देशात अव्वल ठरले आहे. ‘इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स (ईओएलआय) २०२०’ मध्येही शहराच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून, देशातील ‘टॉप ट्वेन्टी’ शहरांमध्ये १६वे स्थान पिंपरी चिंचवड शहराला मिळाले आहे. सन २०१८च्या सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा क्रमांक ६७ वा होता.

‘इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स (ईओएलआय) २०२०’ आणि ‘म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) २०२०’ च्या क्रमवारीची घोषणा आज केंद्राच्या वतीने करण्यात आली. गृहनिर्माण व शहरी कामकाज राज्यमंत्री मा. श्री. हरदीपसिंग पुरी यांनी आज ऑनलाइन कार्यक्रमात या अंतिम क्रमांकाची घोषणा केली, यावेळी मा. श्री. दुर्गा शंकर मिश्रा, सचिव, मंत्रालय व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सन २०२०मध्ये झालेल्या या सर्वेक्षणासाठी राहण्यास योग्य शहर, महानगरपालिकेचे कामकाज व शहराचे हवामान हे तीन निकष निश्चित करण्यात आले होते व याबाबत नागरिकांची मते जाणून घेवून सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार होता. या सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह देशातील ११४ व राज्यातील १२ शहरांचा सहभाग होता. नागरिकांना पुरविण्यात येणा-या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केंद्र शासनाने निश्चित केले होते. ‘नागरिकांचा सहभाग’ हा यावर्षीच्या ‘इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स (ईओएलआय) २०२०’ आणि ‘म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) २०२०’ चा महत्वाचा व नवा पैलू होता. ऑनलाइन आणि ऑफलाइन सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना शहराबद्दलची आपली मते थेट नोंदविणे यामुळे शक्य झाले होते. पिंपरी चिंचवड शहरातील ५५,०००हुन अधिक नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला होता.

याविषयी बोलताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी सांगितले, “प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविणेसाठी आवश्यक आहे. ‘इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स (ईओएलआय) २०२०’ आणि ‘म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) २०२०’ द्वारे प्राप्त होणा-या माहितीमुळे महानगरपालिकेतर्फे नागरिकांना शहराबद्दल नेमके काय वाटते, पालिकेतर्फे देण्यात येणा-या सुविधांबाबत नागरिकांचे मत काय आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. ‘म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (एमपीआय) २०२०’ मध्ये देशपातळीवर शहराला मिळालेला चौथा क्रमांक हा नागरिकांचा प्रशासन व प्रशासनातील कामकाजावरील विश्व