आपला आवाज आपली साखींनी छत्रपतींना वृक्षारोपणाने दिली अनोखी मानवंदना…

पिंपरी चिंचवड दि.19
लक्ष्मण दातखिळे,पिंपरी-चिंचवड प्रतिनीधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमाने साजरी करण्याचे महाराष्ट्र शासनाचे निर्देश होते. अशातच सह्याद्री वनराई संस्थेचे अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वृक्षारोपण उपक्रमाला अनुसरून आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे आणि सामाजिक कार्यकर्त्या योगिता म्हस्के यांनी जयंती निमित्त सखींना वृक्षारोपण करून शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सखींनी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी भोसरी MIDC येथील महानगरपालिकेच्या " पर्यावरण संस्कार उद्यानात प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण केले. तर अनेक सखींनी आपल्या अंगावर व परसबागेत वृक्षारोपण केले. 

      उद्यानात जांभूळ, चिंच, उतरावंती अश्या विविध जातींची रोपे लावण्यात आली. या उपक्रमासाठी नाना काटे सोशल फाउंडेशन आणि महापालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे, सामाजिक कार्यकर्त्या योगिता म्हस्के, नगरसेविका शीतल नाना काटे, नंदादीप प्रतिष्ठान च्या संस्थापक अध्यक्षा निता ढमाले तसेच आपली सखी सभासद उपस्थित होत्या.

चौकट : पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरामधील आपला आवाज आपली सखीच्या तीस हजार महिला सभासदांनी आपल्या अंगनात व परिसरात एक झाड लावून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अनोखी मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *