युवक काँग्रेस चे पुस्तक वाटपाद्वारे शिवरायांना वंदन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी दि. १९ फेब्रुवारी २०२१
देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१व्या जयंती निमित्त आज पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने भोसरी लांडेवाडी येथील शिवस्मारका जवळ ‘रयतेचा राजा’ या पाॅकेट पुस्तिकेचे वाटप उपस्थित शिवप्रेमींना करण्यात आले.

या बाबत माहीती देताना उपक्रमाचे आयोजक व युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “शिवजयंती निमित्त शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाच्या आठवणींना उजाळा मिळावा व त्यातूनच आजच्या युवा पिढी ला प्रेरणा मिळावी या उद्देशाने युवक काँग्रेसच्या वतीने आज या पाॅकेट पुस्तिकेचे वाटप करून शिवरायांना कार्यरूपी अभिवादन करत आहोत.

या छोटे खानी पाॅकेट पुस्तिकेत चित्र संदर्भासहित शिवचरित्र दर्शविले आहे यातून विशेषत: लहानांना सुलभ पध्दतीने समजेल व वाचनांची आवड निर्माण होऊन त्यांना इतिहासाची जाणीव करून देता येईल व आजच्या पिढीला जी पिढी माहीती तंत्रज्ञानाच्या या विश्वात आपला इतिहास विसरत चालली आहे त्यांना शिवचरित्रातून योग्य दिशा व आत्मबळ मिळेल.” असे बनसोडे यांनी सांगितले.

या ठिकाणी शिवरायांना वंदन करायला आलेल्या बालगटांना, युवक समुहानां व महीला गटांना या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे ,पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेस चे शहर सरचिटणीस राहूल काळभोर, शंकर ढोरे, अलोक लाड, विरेंद्र गायकवाड, मिलिंद बनसोडे व प्रविण जाधव, राकेश सपांगे, आकाश जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.