भाजपाला मोठा धक्का…भाजप नगरसेविका माया संतोष बारणे यांचा शिक्षण समिती सदस्य पदाचा राजीनामा

बातमी प्रतीनीधी
रोहीत खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि ११ फेब्रुवारी
काही महिन्यांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे…अशातच वातावरणात जरी थंडावा असला तरी राजकिय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे.जवळपास चार वर्षे सत्ते असणा-या भारतीय जनता पार्टीला शहरात घरघर लागल्याचे दिसत आहे...

सत्ताधारी भाजपा जरी मागील चार वर्षांत विकासाचा दावा करीत असली तरी काहि सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधक यांनी सत्ताधारी भाजपावर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे...

सत्ताधारी भाजप मधील अनेक नगरसेवक हे नाखूश असल्याचेही बोल्या जात आहे…अशातच शिक्षण समिती सदस्या माया बारणे यांनी सदस्य पदाचा तडकाफडकी राजीनामा देत पक्षाच्या कामकाजावर समाधानी नसल्याचे म्हटले आहे…व मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत काम करणार असल्याचे आपला आवाजकडे बोलताना सांगितले.

गेली चार वर्षे सत्ते पासून दूर असलेली  राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपला घरातूनच मिळत असलेल्या घरच्या आहेरावर लक्ष ठेवून आहे...

भाजपा मधील नाराज गट आपल्या बाजूने ओढण्यासाठी विरोधकांची फिल्डींग सक्रिय झाली असल्याची चर्चाही शहरात होत आहे...

भाजपाचे शहर अध्यक्ष भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे हे कुस्तीच्या आखाड्यातील पहिलवान असल्याने राजकीय आराखडे आणि डावपेचही त्यांना माहीत आहेत.पक्षात होत असलेली कुरबूर आणि नाराजी यावरही महेश लांडगे यांचे लक्ष आहे ते या बाबत काय भूमिका घेतात हे ही लवकरच समोर येईल…

तूर्तास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील बदलती राजकीय समीकरणे ही शहराच्या चौका चौकात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय होत आहे...