मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक ठरलेल्या भेटी मुळे, गोरखे कुटुंबाचा आनंद द्विगुणित

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी दि 23 जानेवारी भोसरी मध्ये एक कार्यक्रमानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते त्या प्रसंगी भाजप चे प्रदेश सचिव याना थेट देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी फोन करून अमित मी दुपारी तुझ्या घरी जेवायला येतो आहे,साधे जेवण बनवा. व काही तासा नंतर मा देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्या समवेत गोरखे यांच्या घरी आले, सह कुटुंब त्यांचे स्वागत करण्यात आले.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी गोरखे कुटुंबियांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवारा सोबत सहभोजन घेतले, त्यांच्यासोबत माजी मंत्री व भाजपा नेते माननीय गिरीशजी महाजन उपस्थित होते, याप्रसंगी परिवारासोबत त्यांनी चर्चा विनिमय केले तसेच इथल्या राजकीय-सामाजिक विषयांची माहिती घेतली.

माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन त्यांनी माझ्या कुटुंबासाठी दिलेला वेळ हा माझ्यासाठी अविस्मरणी क्षण ठरला. या प्रसंगी प्रभू श्रीराम यांची मूर्ती व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचारधन अर्थात त्यांच्या साहित्याचा संच मी, त्यांना भेट म्हणून दिला… असे अमित गोरखे यांनी सांगितले. यावेळी अमित गोरखे यांची आई नगरसेविका अनुराधा गोरखे व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते..


फडणवीस यांच्या अचानक भेटीने सर्व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.