पिंपरी चिंचवड
२९ सप्टेंबर २०२२
दिनांक – २६ सप्टेंबर पासुन सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सण साजरे करता आले नाहीत,परंतु करोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे यावर्षी एक प्रकारचे चैतन्य समाजातील सर्वच घटकांमध्ये दिसून येत आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चिंचवड येथील रांका ज्वेलर्स यांच्या वतीने “सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्रीशक्तीचा” या विशेष उपक्रमांतर्गत नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जात आहे.
प्रत्येक सणसमारंभ म्हणजे सर्व महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते,सण म्हणजे महिलांना नविन साडी,दागिणे मैत्रिणी बरोबर फिरणे मज्जा करणे,आपल्या परिवारासोबत वेळ घालवणे,परंतु या सर्व गोष्टी पासुन आपल्या समाजातील महिला पोलिस नेहमीच वंचित राहतात,त्यांना आपल्या कामाविषयी असणारी निष्ठा व कर्तव्य यामुळे त्यांना यासर्व गोष्टी पासून नेहमीच दुर रहावे लागते,या सर्व बाबींचा विचार करून दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्रीच्या चौथ्या माळेचे औचित्य साधुन पिंपरी चिंचवड शहरातील महिला पोलीस यांचा सपना छाजेड,सामाजिक कार्यकर्त्या व अँड.कोमल सांळुखे ,संस्थापक राणी पुतळाबाई महिला लाँ काँलेज यांच्या हस्ते “सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्रीशक्तीचा” या विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.या दिवशी सर्व पोलिस महिला पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून उपस्थित राहिल्या होत्या.
रांका ज्वेलर्सच्या वतीने त्यांचा दालनात असलेले नवनवीन डिजाईन चे “ब्रायडल कलेक्शन” चे दागिने घालून उपस्थित पोलिस महिलांचे फोटोशूट करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नेहमीच्या धावपळीच्या जीवनातुन स्वतः साठी थोडा वेळ काढुन असे फोटोशुट करण्याची संधी रांका ज्वेलर्स यांनी महिलांनी दिली त्याबद्दल सर्व महिलांनी रांका ज्वेलर्स यांचे आभार मानले. तसेच या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगिता तरडे यांनी दिली,त्याबद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले.