चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २१ दिवसात फाशी द्या- मनसे च्या सौ.अनिता पांचाळ यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी :- दि. २३ जानेवारी २०२१

नांदेड जिल्ह्यातील,मौजे दिवशी ( बु ) तालुका भोकर येथे पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करून व तिचा खुन करून मृतदेह नदीपात्रात टाकले.


सविस्तर असे की दिवशी बु. गावातील शेतकऱ्याची ५ वर्षांची निरागस चिमुकली आहे, दि.२० जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजतापासून मुलगी घरी नसल्याने तिचा शोध घेणे सुरू केले, परंतु ती मिळाली नसल्याने कुटूंबीयांनी याबाबतची माहिती भोकर पोलीसात दिली.तसेच शोध सुरू ठेवला असता त्यांच्या शेतात काम करणारा सालगडी वय ३५ हा नराधम मुलीला पळवून नेले,असावे असा शंयश व्यक्त होत असल्याने शोध मोहीम सुरूच ठेवली याच दरम्यान सायंकाळी त्या चिमुकलीचा नि वस्त्र व गंभीर अवस्थेतील मृतदेह दिवशी बु.पासून काही अंतरावर तेलंगणा राज्य सीमे सुधा नदी पात्रतात सापडला,हि दुदैवी घटना दुुपारी २:००ते ६:०० वाजता च्या दरम्यान घडली असून त्या नराधमास भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, सदरील प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमास तात्काळ नवीन दिशा कायद्यानुसार २१ दिवसात फाशीची शिक्षा देऊन पिडीत चिमुकली व तिच्या कुटूंबियास न्याय द्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड च्या शहर उपाध्यक्षा सौ.अनिता बालाजी पांचाळ यांनी केले राज्याच्या गृहमंत्र्यांकडे मागणी, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अमानवी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज अन्याय अत्याचार होत आहे, ही खेदाचीत बाब आहे, त्यामुळे देशात व राज्यात महीला मध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, जोपर्यंत अशा नराधमास फासावर लटकवून फाशी दिली जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत यासाठी अस्या नराधमास तात्काळ नवीन नवीन दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फासावर लटकवून फाशी दिली पाहिजे असे निषेधार्थ मत मनसेच्या सौअनिता बालाजी पांचाळ यांनी आपला आवाज शी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *