शहराच्या सौंदर्यात भर घालणारे बर्ड व्हॅली येथील म्युझीकल फाउंटनच्या कामास माजी उपमहापौर नगरसेवक तुषार हिंगे यांच्या उपस्थितीत सुरुवात..

रोहित खर्गे, विभागीय संपादक

शाहूनगर – चिंचवड दि १३ जानेवारी
शाहूनगर मोरवाडी प्रभागाबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या व पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रकल्पापैकी अत्यंत महत्त्वाच्या अशा बर्ड व्हॅली उद्यानांमध्ये म्युझिकल फाऊंटन चे काम सुरू करण्यात आले असून त्यासंदर्भात माजी उपमहापौर नगरसेवक तुषार हिंगे यांनी आज संबंधित अधिकारी यांच्यासमवेत सुरू केलेल्या कामाची पाहणी केली व लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने हे काम पूर्ण करावे म्हणजे येणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांना त्याचा आनंद घेता येईल.

असे तुषार हिंगे यांनी आपला आवाजकडे बोलताना सांगितले.