राष्ट्रीय आईस व्हाँकी प्रशिक्षण शिबीरात पुणे पिंपरी चिंचवड मधील पाच खेळाडूंचा समावेश

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे ;- दि १३ जानेवारी २०२१
भारतीय आईस व्हाँकी महासंघ व जम्मू काश्मीर आईस व्हाँकी संघटनेच्या वतीने गुलमर्ग (जम्मू काश्मीर ) येथे आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीरात महाराष्ट्रातील ३७ खेळाडुंची निवड झाली असल्याची माहिती आईस व्हाँकी आँफ महाराष्ट्राचे सचिव आणि मुख्य प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांनी दिली.
भारतीय आईस व्हाँकी महासंघाचे तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले हे शिबीर १ जानेवारी ते १४ जानेवारी २०२१ पर्यंत असणार आहे.यानंतर १६ जानेवारी पासून चालू होणाऱ्या १० व्या वरिष्ट गटातील आणि २७ जानेवारीपासून लडाख येथे होणाऱ्या ६ व्या ज्युनिअर गटातील राष्ट्रीय हाँकी स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी १५ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.या निवड चाचणीतून पुरूष व महिलांचा अंतिम संघ निवडण्यात येणार आहे.

या शिबीरात महाराष्ट्राकडून पुण्यातील स्केट मास्टर्स क्लबचे हिमांशू राळे,पियुष क्षिरसागर,सार्थक मटाले,आगम शहा,आशुतोष तळेकर या पाच खेळाडुंची निवड झाली आहे.तसेच पार्थ जगताप या आंतरराष्ट्रीय खेळाडुचाही या शिबीरात सहभाग आहे.निवड झालेल्या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक शैलेंद्र पोतनीस,पार्थ जगताप आणि आईस व्हाँकी असोसिएशन आँफ महाराष्ट्राचे सचिव,प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.