शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला शिवसेनेतर्फे जोडे मारून जाहीर निषेध

रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

भोसरी दि १२ डिसेंम्बर भोसरी विधानसभेच्या वतीने शेतकऱ्यांबद्दल या शेतकरी आंदोलनाला कोणाचा पाठिंबा नसून यासाठी रसद पाकिस्तानातून येते असे बेताल वक्तव्य केले व असे वक्तव्य ते नेहमीच करतात आशा वाचाळवीरांना धडा शिकवला पाहिजे, ते केंद्रीय मंत्री आहेत भाजप चे माजी प्रदेशाध्यक्ष होते त्यांना असे वक्तव्य शोभत नाही व बोलण्याचे भान रहात नाही जो जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आहे त्यांच्याविषयी काहीही बोललेलं सहन केले जाणार नाही. मोदी लाटेवर व आर एस एस च्या जीवावर निवडून आलेले हे नगरगठ्ठ नेते शेतकऱ्यांना जुमानत नाहीत तर सामान्य जनतेचा काय मान राखणार. व अशा वाचाळ नेत्यांना जोडेच मारायला हवे.

सेना जिल्हा उपप्रमुख निलेश मुटके निषेध वेक्त करताना म्हणाले की हे गल्लीतील नेते नसून केंद्रीय मंत्री आहेत त्यांना अशी भाषा शोभते ? सैनिक, शेतकरी सामान्य नागरिक यांचा ते नेहमीच अनादर करतात. केव्हा साला म्हणून शिवी देतात तर केव्हा शेतकरी आंदोलनाला रसद पाकिस्तानकडून पुरवली जाते अशा बेताल वक्तव्याचा शहर शिवसेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो व त्यांच्या प्रतिमेला जोडे मारतो जेणेकरून त्यांनी सुधरावे व भविष्यात अशी बेताल वक्तव्य करू नये.

त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारून व घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला याप्रसंगी जिल्हासंघटिका सुलभा उबाळे विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, युवासेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे, सचिन सानप, समन्वयक अंकुश जगदाळे , दादा नरळे , सर्जेराव भोसले, विभाग प्रमुख सतीश दिसले, गणेश इंगवले, सतीश मरळ शाखाप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते .